3 लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याबद्दल विचार- अब्दुल सत्तार
दरम्यान काही दिवसांपूर्वीच मंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीबद्दल एक विधान केले होते. “कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे. केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार काही वाटा टाकून 3 लाख रुपयांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतं का, याची माहिती सरकार गोळा करू लागलं आहे. सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्वक आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले होते. त्यामुळे आता खरंच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.