महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची होणार निर्मिती, नवीन जिल्ह्यांची यादी पहा

Maharashtra Districts List : महाराष्ट्र सरकारने राज्यात २२ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात एकूण जिल्ह्यांची संख्या ३६ वरून ५८ होईल. यामध्ये नाशिक, पालघर, अहमदनगर, ठाणे, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, बीड, लातूर, नांदेड, जळगाव, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांची विभागणी करून नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत. या निर्णयाचे स्वागत राज्यातील अनेक नेत्यांनी केले आहे. त्यांनी या निर्णयामुळे राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल आणि नागरिकांना प्रशासनापर्यंत पोहोचण्यास सोपे होईल असे म्हटले आहे.

Bank Cash Deposit Rule 2024 |20 जुलै पासून “या” दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम

नवीन जिल्ह्यांची यादी खालीलप्रमाणे आहे ;

नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे तयार केले जाणार आहेत.
पालघर जिल्ह्याचे विभाजन करून जव्हार हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर हे तीन जिल्हे नव्याने तयार केले जाणार आहेत.
ठाणे जिल्ह्याचे आणखी विभाजन करण्याचा प्लॅन असून मीरा-भाईंदर आणि कल्याण या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे.
पुणे जिल्ह्यातून शिवनेरी जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
रायगड मधून महाड जिल्हा तयार केला जाणार आहे.
सातारा जिल्ह्याचे विभाजन करून मानदेश हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मानगड हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.

namo kisan beneficiary status:नमो शेतकरी योजना 3रा हप्ता 6000 हजार रुपये या दिवशी जमा होणार,पहा गावानुसार यादीत नाव

 

बीडमधून अंबाजोगाई हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
लातूर मधून उदगीर हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
नांदेड मधून किनवट हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
जळगाव मधून भुसावळ हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
बुलढाणा मधून खामगाव आणि अचलपूर हे दोन नवीन जिल्हे तयार केले जाणार आहेत.
यवतमाळ मधून पुसद हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
भंडारा मधून साकोली हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
चंद्रपूर मधून चिमूर हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.
गडचिरोली मधून अहिरे हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.

या नवीन जिल्ह्यांची निर्मिती केल्याने राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम होईल. तसेच, जिल्हा मुख्यालयापासून दूर असलेल्या भागातील नागरिकांना शासकीय सुविधांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र व जिल्हा मुख्यालयापासून लांब असणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेवून जिल्ह्याचे विभाजन व्हावे, अशी मागणी सातत्याने होत असते. यापूर्वीचा इतिहास पाहिल्यास १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. राज्याची स्थापना झाली त्यावेळी २६ जिल्हे होते, मात्र त्यानंतर लोकसंख्या वाढली तसेच Maharashtra Districts List

क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही अनेक जिल्हे मोठे असल्याने प्रशासकीय कामानिमित्त सर्वसामान्य नागरिकांना मुख्यालयी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे अवघड झाले होते, त्यामुळे टप्प्या टप्प्याने १० नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले होते.राज्यात आजच्या घडीला असे अनेक जिल्हे आहेत जे अनेक किलोमिटर पसरलेले आहेत, विशेष करून ग्रामीण भागात जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे म्हटले की, ये-जा करण्यात पूर्ण दिवस घालवावा लागतो, म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शिवाय प्रशासकीय यंत्रणेलाही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात. त्यामुळे नवीन जिल्हे निर्माण होणे आवश्यक असून, सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Leave a Comment